शेती का परवडत नाही.(Sheti Totyat Janyache Karne)
नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आपण या लेखांमध्ये शेती तोट्यात जाण्याची काही कारणे पाहुयात. तसं पाहिलं तर शेती हा गुणाकाराने वाढणारा व्यवसाय आहे. आपण शेतीमध्ये जर एक बी टाकले तर त्यापासून आपल्याला हजारो बिया मिळतात, तरीसुद्धा शेती हा व्यवसाय तोट्यात जातोय.
तर शेतकरी बांधवांनो आपण या लेखात शेती तोट्यात जाण्याची पाच कारणे पाहणार आहोत.जे की प्रत्येक शेतकऱ्याला माहित पाहिजेत. हे कारणे माहीत असतील तर, शेतकरी नक्कीच त्याच्या शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो. (Sheti Totyat Janyache Karne)
औषधी व खताचे अपुरे ज्ञान
शेतकरी बांधवांनो आपले बरेचसे शेतकरी हे आपली शेती कृषी केंद्राच्या भरोशावर करतात. कृषी केंद्रा वाल्याने सांगितले हे खत घेऊन जा तर आपण तेच खत आणतो. कृषी केंद्रवाला म्हणाला या औषधाचे फवारणी घ्या. तर आपण तीच फवारणी घेतो पण खरंच आपल्या पिकाला त्या औषधाची किंवा खताची गरज आहे का ?
तर या गोष्टीचा विचार आपण करत नाही. तसेच या गोष्टीचे ज्ञान देखील आपल्याकडे नाहीये म्हणून शेती कृषी केंद्र वाल्याच्या भरोशावर केली जाते. तर शेतकरी बंधूंनो आजच्या या डिजिटल युगात आपण सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. इंटरनेट सुविधा ही सर्वीकडे उपलब्ध आहे .आपण या इंटरनेटच्या माध्यमातून खत व्यवस्थापन औषध व्यवस्थापन शिकले पाहिजे. तसेच विविध कृषी आधारित कार्यक्रम पाहिले पाहिजेत.(Sheti Totyat Janyache Karne)
योग्य बियाण्यांची निवड
बघा शेतकरी बांधवांनो संत तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेलेले आहेत. की ||शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी || तर महाराजांच्या या अभंगाप्रमाणे आपण जर बियाणे निवडताना चूक केली तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. आज मार्केटमध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या कंपन्या आहेत. प्रत्येक जण म्हणतो आमचाच वाण चांगला आहे .पण आपण त्यांच्यावर विश्वास न ठेवता आपण आपल्या काही शेतकऱ्यांचे अनुभव घेतले पाहिजे. तसेच आपल्या शेजाऱ्यांना त्यांच्या बियाण्याचे अनुभव आपण विचारले पाहिजेत. यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहून त्यांनी कुठले बियाणे वापरले आहे. ते पाहिले पाहिजे तसेच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर कुठले बियाणे चांगले आहेत ते सुद्धा पाहिले पाहिजे.(Sheti Totyat Janyache Karne)
तन नाशक वापर
तर शेतकरी बांधवांनो आपण आपल्या मुख्य पिकांमध्ये जसं की तुर, सोयाबीन, कापूस यामध्ये तन नाशक वापरतो. तर तणनाशक हे हरितद्रव्य मारण्याचे काम करते. ज्या वेळेस आपण तन नाशक मारतो तेव्हा त्या मुख्य पिकामध्ये सुद्धा हरितद्रव्य मारण्याचे काम होत असते. हरितद्रव्य मारल्यामुळे त्या पिकाची वाढ थांबली जाते. नेमका आपण सुरुवातीच्या काळात तणनाशकाचा वापर करतो, त्यामुळे त्या पिकाच्या फुटव्याची संख्या देखील कमी होते .जर फुटवेच कमी असतील तर आपलं उत्पादन देखील नक्कीच कमी होते.
बऱ्याच वेळा तणनाशकामुळे मुख्य पीक त्या ठराविक काळापुरता अन्न घेण्याचे काम बंद करते. व ते स्ट्रेस मध्ये चालले जाते त्यामुळे त्याच्या वाढीवर परिणाम होतो .परिणामी आपला उत्पादन कमी होतं. म्हणून तणनाशकाचा वापर शक्य तितका पाहिजे. (Sheti Totyat Janyache Karne)
सिंचन व्यवस्थापन
शेतकरी बंधूंनो पाणी पिकाला नाही जमिनीला नाही, तर पिकाच्या मुळाला ओलावा टिकून राहण्यासाठी द्यायचे असते. पण आपल्याकडे होतं काय पाणी या शेतातून दुसऱ्या शेतात जाईपर्यंत सोडतो. तर त्यामुळे होत असं की पाणी वाहून जाताना त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच खत सुद्धा सोबत घेऊन वाहते.
तर शेतकरी बंधूंनो आपल्याला पाणी देण्याच्या पद्धतीत बदलाव करावा लागेल. पारंपारिक पद्धत वापरून आपण पाट पाणी देत असाल तर नक्कीच आपले उत्पादन कमी होते.
बाहेर देशाचा आपण विचार केला तर या देशातील जे शेतकरी आहेत ,ते 70 ते 80 टक्के ड्रिप इरिगेशन चा वापर करतात. 100% ड्रीप इरिगेशन चा वापर करणारा देश म्हणून इजराइल हा देश ओळखला जातो. तिथला शेतकरी ड्रिप इरिगेशन चा वापर करून भरघोस उत्पन्न मिळतो. तर आपल्याला सर्वप्रथम पाट पाण्यावरून ड्रिप इरिगेशन कडे वळावे लागेल. ड्रिप इरिगेशन मुळे आपल्या मजुरीमध्ये सुद्धा बचत होते. तसेच कष्ट सुद्धा कमी लागतात कमी पाण्यात व कमी वेळात आपण जास्त जमिनीला पाणी देऊ शकतो. ड्रिप इरिगेशन मुळे 50 टक्के पाण्याची बचत होऊ शकते. (Sheti Totyat Janyache Karne)
जमिनीचा PH, जमिनीचा सेंद्रिय कर्ब
शेतकरी बांधवांनो आज आपण जे काही केमिकलचे खते टाकतो ,त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब बिघडलेला आहे.त्याचबरोबर आपण टाकलेल्या अति प्रमाणात खतांमुळे जमिनीचा PH देखील बिघडलेला आहे. PH व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी आपण कुठलीच गोष्ट करत नाही. PH व सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त जैविक प्रॉडक्ट चा वापर केला पाहिजे.
आपल्या आजूबाजूला काही शेतकरी खूप चांगलं उत्पादन घेत आहेत. तर काही शेतकरी आजही कर्जबाजारी आहेत. त्या सर्व शेतकरी बांधवांनी या पाच गोष्टीवर विचार करून त्या अमलात आणायचा प्रयत्न करायला पाहिजे.
शेतकरी मित्रांनो या पाच कारणांमुळे आपली शेती ही तोट्यात जात आहे.आपण या कारणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ही अनेक काही कारण आहेत. ज्यामुळे आपली शेती तोट्यात जात आहे. तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला या पाच गोष्टींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. (Sheti Totyat Janyache Karne)
Join Our Whatsapp Group :- Click Here